Friday, July 31, 2026
publicreportermarathi
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन
No Result
View All Result
publicreportermarathi
No Result
View All Result

सातारा : पाटणमध्ये माती उत्खननाचा ‘शॉक’; शेकडो विजेचे खांब धोक्यात

Public Reporter Marathi by Public Reporter Marathi
March 9, 2026
in maharashtra
0
सातारा : पाटणमध्ये माती उत्खननाचा ‘शॉक’; शेकडो विजेचे खांब धोक्यात
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

असुरक्षित वीज खांबांमुळे शेतकरी व गावकऱ्यांची चिंता; महावितरण अनभिज्ञ ?

By | अरविंद जाधव 

सातारा : पाटण तालुक्यात नदीकाठावर सुरू असलेल्या माती उत्खननामुळे शेती व घरांना वीजपुरवठा करणारे अनेक विजेचे खांब धोकादायक स्थितीत आले आहेत. उत्खनन करताना काही ठिकाणी खांबांच्या सभोवतालची माती पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून ते अक्षरशः कोरीव पद्धतीने उभे असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थिती किंवा अतिवृष्टीच्या काळात हे खांब कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून यामुळे महावितरणसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील नदीकाठच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू आहे. या उत्खननादरम्यान अनेक ठिकाणी शेतीपंप आणि घरांना वीजपुरवठा करणाऱ्या खांबांच्या सभोवतालची माती काढून टाकण्यात आली आहे. परिणामी काही खांब हवेत उभे असल्यासारखे दिसत असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

या उत्खननस्थळी अशा प्रकारे शेकडो विजेचे खांब क्षतिग्रस्त अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र या प्रकाराबाबत महावितरणला माहिती आहे का, तसेच संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. माती उत्खननासाठी परवाने देताना महसूल, सिंचन तसेच इतर संबंधित विभागांकडून ‘ना-हरकत दाखले’ घेणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात महावितरणची संमती किंवा माहिती घेण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर तसे झाले नसेल, तर हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

या परिसरातील अनेक विजेचे खांब हे कोयना नदीच्या पूररेषेखाली येतात. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास या खांबांची स्थिती अधिकच धोकादायक होऊ शकते. खांबांची पायाभूत माती आधीच काढून टाकल्यामुळे ते सहज कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खांब कोसळल्यास वीजतारा तुटून परिसरात करंट पसरू शकतो. त्यातून शेतकरी, नागरिक तसेच जनावरांसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः शेतीपंपाजवळ किंवा पाण्यात वीजप्रवाह गेल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विजेचे खांब सुरक्षित नसल्यास नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. खांब कोसळल्यास वीजतारा तुटून परिसरात करंट पसरू शकतो, ज्यामुळे जखमी होणे किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यापूर्वी वादळात खांब पडल्यामुळे घरे, कृषी वाहने, किंवा शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. काही वेळा तारा एकमेकांना घासल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचाही धोका निर्माण होतो. अशा घटनांमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना तसेच कृषी उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे धोकादायक झालेले खांब पुन्हा बसवण्याची जबाबदारी कोणाची? साधारणपणे एका विजेच्या खांबासाठी २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत शेकडो खांबांचे पुनर्वसन करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. हा खर्च महावितरण उचलणार की उत्खनन करणाऱ्या संबंधितांकडून वसूल केला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

या प्रकारामुळे महसूल, वनविभाग, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महावितरण या सर्व विभागांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कोयना नदीकाठावरील शेतीपंपांवर सिंचन विभागाचे नियंत्रण असते. मात्र त्यांना वीजपुरवठा करणाऱ्या पूररेषेखालील खांबांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का झाले, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी किंवा पिकांच्या नुकसानीच्या वेळी महसूल अधिकारी शेतात जाऊन पंचनामे करतात. तसेच ई-पीक नोंदणीची प्रक्रिया देखील नियमितपणे होत असते. मात्र या संभाव्य धोक्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष का झाले, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.

नदीकाठावरील शेती व परिसरातील विजेच्या पायाभूत सुविधांवर कृषी पर्यटनही काही प्रमाणात अवलंबून आहे. सध्या नदीचा देखावा पाहण्यासाठी अनेकांनी नदीकाठी पर्यटन प्रकल्प, हॉटेल व्यवसाय आणि इतर उपक्रमांची योजना आखली आहे. कोयना नदी परिसरात जलपर्यटन विकसित करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. मात्र नदीपात्रातून अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात माती काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलपर्यटनातील बोटी भरकटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि मानवी दुर्घटनेची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

भारतीय विद्युत कायदा 2003 काय सांगतो ?

जर एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे विजेचा खांब, तारा किंवा इतर विद्युत यंत्रणा नुकसानग्रस्त झाली, तर महावितरण त्या व्यक्तीवर कायदेशीर आणि आर्थिक कारवाई करू शकते. अशा प्रकरणांमध्ये नुकसान झालेल्या यंत्रणेची दुरुस्ती करण्याचा संपूर्ण खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जातो. जर प्रकरण गंभीर असल्यास भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या कायद्यानुसार सार्वजनिक विद्युत मालमत्तेचे नुकसान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. दोषी व्यक्तीवर दंड, नुकसानभरपाई तसेच काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

Tags: #SataraNews #PatanTaluka #Mahavitaran #ElectricPoleIssue #SoilExcavation #MaharashtraNews #BreakingSatara #RuralInfrastructure #ElectricitySafety #GroundReport
Previous Post

इराणची नवी रणनिती? नकली जहाज व विमान तयार करून शत्रूला फसवण्याचा प्रयत्न

Next Post

मुंबईत LPG गॅस तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Public Reporter Marathi

Public Reporter Marathi

Next Post

मुंबईत LPG गॅस तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

by Public Reporter Marathi
July 31, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 जागतिक पार्श्वभूमी – वाढता साठा आणि आकडेवारी जागतिक स्तरावर चीनच्या युरेनियम साठ्याबाबत चिंतेचे वातावरण...

अमेरिकेचे प्रहार; मध्यपूर्वेत हवाई हल्ल्यांची जोरदार मालिका

अमेरिकेचे प्रहार; मध्यपूर्वेत हवाई हल्ल्यांची जोरदार मालिका

by Public Reporter Marathi
July 30, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 रात्री सुरू झालेले समन्वित हल्ले अमेरिकेने मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अत्यंत अचूक आणि नियोजित लष्करी...

पाकिस्तानमध्ये आंदोलन पेटले; 35 आंदोलकांचा मृत्यू, कारवाईवर तीव्र संताप

पाकिस्तानमध्ये आंदोलन पेटले; 35 आंदोलकांचा मृत्यू, कारवाईवर तीव्र संताप

by Public Reporter Marathi
July 29, 2026
0

🔴 By | प्रविण कदम 🟡 आंदोलनाचा उद्रेक कशामुळे? पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये अलीकडेच घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष...

कॉक्रोच पार्टीच्या दणक्यानंतर आता ‘E20 जनता पार्टी’चा इशारा; सरकारसमोर नवं टेन्शन उभं राहणार?

कॉक्रोच पार्टीच्या दणक्यानंतर आता ‘E20 जनता पार्टी’चा इशारा; सरकारसमोर नवं टेन्शन उभं राहणार?

by Public Reporter Marathi
July 27, 2026
0

🔴 By | प्रविण कदम मुंबई - देशात इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावरून निर्माण झालेला वाद आता आणखी तीव्र होण्याची...

अमित शाह यांचा राजीनामा मागणी ? आंदोलन व विरोधकांचा वाढता दबाव अधिवेशनात रंग आणणार?

अमित शाह यांचा राजीनामा मागणी ? आंदोलन व विरोधकांचा वाढता दबाव अधिवेशनात रंग आणणार?

by Public Reporter Marathi
July 26, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात  नवी दिल्ली - देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा...

जंतर मंतर परिसरात अन्नसेवा बंदी? दिल्ली पोलिसांची ऑनलाइन अन्नपुरवठा कंपन्यांना निर्देश

जंतर मंतर परिसरात अन्नसेवा बंदी? दिल्ली पोलिसांची ऑनलाइन अन्नपुरवठा कंपन्यांना निर्देश

by Public Reporter Marathi
July 25, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 आंदोलनाची पार्श्वभूमी आणि वाढती वस्तुस्थिती राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका फुटीच्या...

“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र” — 26 जुलै मुंबई मोर्चा

“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र” — 26 जुलै मुंबई मोर्चा

by Public Reporter Marathi
July 23, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 NEET पेपर लीक: विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह NEET (UG) परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात...

पाकिस्तान मागतोय भारताकडे पाणी; इंडस करार पुन्हा चर्चेत

पाकिस्तान मागतोय भारताकडे पाणी; इंडस करार पुन्हा चर्चेत

by Public Reporter Marathi
July 22, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 इंडस कराराचा उगम आणि स्वरूप 1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंडस वॉटर ट्रीटीवर...

मुंबईत जमावबंदी आदेश लागू; आंदोलन आणि सुरक्षा धोक्यांमुळे पोलिसांची कडक कारवाई

मुंबईत जमावबंदी आदेश लागू; आंदोलन आणि सुरक्षा धोक्यांमुळे पोलिसांची कडक कारवाई

by Public Reporter Marathi
July 21, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 तणावपूर्ण पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई...

बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा; पाकिस्तानात तणाव वाढला

बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा; पाकिस्तानात तणाव वाढला

by Public Reporter Marathi
July 20, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 बलुचिस्तान स्वातंत्र्याचा दावा; व्हायरल चर्चेमागील सत्य काय? पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताने स्वतःला स्वतंत्र देश घोषित...

इस्रोमध्ये राजीनाम्यांची लाट: ‘ब्रेन ड्रेन’मुळे भारताच्या अंतराळ स्वप्नांना धक्का?

इस्रोमध्ये राजीनाम्यांची लाट: ‘ब्रेन ड्रेन’मुळे भारताच्या अंतराळ स्वप्नांना धक्का?

by Public Reporter Marathi
July 19, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 इस्रोमध्ये ‘ब्रेन ड्रेन’चा स्फोट — भारताचे अंतराळ स्वप्न धोक्यात? भारताच्या अंतराळ क्षेत्रात मोठा हादरा...

अडाणी प्रकरणात नवे वळण: अमेरिकन न्यायालयामुळे संकट वाढणार ?

अडाणी प्रकरणात नवे वळण: अमेरिकन न्यायालयामुळे संकट वाढणार ?

by Public Reporter Marathi
July 18, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 अमेरिकन न्यायालयाची अडाणी प्रकरणात न्याय विभागावर कठोर भूमिका; शपथपत्राची मागणी न्यूयॉर्क: उद्योगपती गौतम अडाणी...

भारताची पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेन – हरित रेल्वे युगाची सुरुवात

भारताची पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेन – हरित रेल्वे युगाची सुरुवात

by Public Reporter Marathi
July 17, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 ऐतिहासिक उद्घाटन – हरियाणातून हरित भविष्याची सुरुवात हरियाणामध्ये भारताच्या पहिल्या हायड्रोजन पॉवर ट्रेनचे भव्य...

एकनाथ शिंदे गटाचा केंद्रात दबदबा? मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 3 पदांची चर्चा

एकनाथ शिंदे गटाचा केंद्रात दबदबा? मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 3 पदांची चर्चा

by Public Reporter Marathi
July 14, 2026
0

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे गटा ला लॉटरी , ‘ऑपरेशन टायगर’चा प्रभाव 🔴 By | अरविंद जाधव मुंबई : दिल्लीतील सत्ताकेंद्रात...

हॉर्मूज बंद, जगात खळबळ: मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती गंभीर

हॉर्मूज बंद, जगात खळबळ: मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती गंभीर

by Public Reporter Marathi
July 12, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 जागतिक व्यापाराला मोठा धक्का मध्यपूर्वेतील तणावाने गंभीर वळण घेतले असून इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या...

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कर्जमाफीचा निर्णय, महिला शेतकऱ्यांना मिळणार नवे हक्क

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कर्जमाफीचा निर्णय, महिला शेतकऱ्यांना मिळणार नवे हक्क

by Public Reporter Marathi
July 11, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात मुंबई : महाराष्ट्राच्या चालू पावसाळी अधिवेशनात सुमारे ₹36,000 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून, याचा...

पेट्रोलमध्ये जैवइंधन मिश्रणावर देशभरात नाराजी; वाहनचालकांचा वाढता विरोध

पेट्रोलमध्ये जैवइंधन मिश्रणावर देशभरात नाराजी; वाहनचालकांचा वाढता विरोध

by Public Reporter Marathi
July 9, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 बदलत्या इंधन धोरणाची पार्श्वभूमी भारत सरकारने इंधन आयात कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि...

साताऱ्यात विजेचा भीषण धक्का; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, गावावर शोककळा

साताऱ्यात विजेचा भीषण धक्का; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, गावावर शोककळा

by Public Reporter Marathi
July 8, 2026
0

🔴 By | प्रविण कदम सातारा - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे....

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; दरडी, पूर आणि शेतीवर मोठा परिणाम

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; दरडी, पूर आणि शेतीवर मोठा परिणाम

by Public Reporter Marathi
July 7, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 राज्यभरात मान्सूनचा जोर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार तडाखा दिला असून राज्यभरात गंभीर परिस्थिती...

विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी, शेतीला दिलासा तर काही ठिकाणी पाणी साचण्याची भीती

विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी, शेतीला दिलासा तर काही ठिकाणी पाणी साचण्याची भीती

by Public Reporter Marathi
July 4, 2026
0

🔴 By | कविता गोहणे 🟡 हवामान खात्याचा अंदाज ठरला अचूक हवामान खात्याने २ जुलैपासून विदर्भात पावसाचा इशारा दिला होता...

मध्य प्रदेश ‘भूत’ रुग्णालय प्रकरण : इमारत नाही, तरी 87 पदे मंजूर — चौकशी व कारवाईची मागणी तीव्र

मध्य प्रदेश ‘भूत’ रुग्णालय प्रकरण : इमारत नाही, तरी 87 पदे मंजूर — चौकशी व कारवाईची मागणी तीव्र

by Public Reporter Marathi
July 4, 2026
0

🔴By | गीतांजली थोरात 🟡 कारवाईचा मुद्दा केंद्रस्थानी इंदूरमधील खजराना सिव्हिल हॉस्पिटल प्रकरणाने प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आणली आहे. रुग्णालय...

इराणमध्ये खामेनेई अंत्यसंस्कार सुरू; ४ ते ९ जुलै दरम्यान भव्य अंत्यसंस्कार विधि , जागतिक लक्ष केंद्रित

इराणमध्ये खामेनेई अंत्यसंस्कार सुरू; ४ ते ९ जुलै दरम्यान भव्य अंत्यसंस्कार विधि , जागतिक लक्ष केंद्रित

by Public Reporter Marathi
July 3, 2026
0

🔴By | कविता घोणे 🟡 खामेनेई यांचा इतिहास इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते आयातुल्ला अली खामेनेई यांनी तब्बल तीन...

महाडमध्ये NDRF टीम तैनात; 2016 पूल दुर्घटना आणि 2021 तळीये भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क

महाडमध्ये NDRF टीम तैनात; 2016 पूल दुर्घटना आणि 2021 तळीये भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क

by Public Reporter Marathi
July 2, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 कोकणात पावसाचा जोर वाढला 30 जवान तसेच यंत्रणा सज्ज. रायगड - जिल्ह्यातील महाड येथे...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! नागरिकत्वावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! नागरिकत्वावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

by Public Reporter Marathi
July 2, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वावरून वाद तीव्र; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या (Birthright Citizenship)...

कर्नाटकात विशेष सखोल मतदार पुनरावलोकन सुरू: मतदार नोंदणी नसल्यास सरकारी लाभांवर परिणाम होण्याची शक्यता

कर्नाटकात विशेष सखोल मतदार पुनरावलोकन सुरू: मतदार नोंदणी नसल्यास सरकारी लाभांवर परिणाम होण्याची शक्यता

by Public Reporter Marathi
July 1, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव बेंगळुरू: कर्नाटकमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया सुरू होताच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी महत्त्वाचा इशारा दिला...

उद्धव ठाकरेंना सलग धक्के! ६ खासदारांनंतर सचिन अहिरही शिंदे गटात; उपसभापती निवडीआधी मोठी राजकीय खेळी

उद्धव ठाकरेंना सलग धक्के! ६ खासदारांनंतर सचिन अहिरही शिंदे गटात; उपसभापती निवडीआधी मोठी राजकीय खेळी

by Public Reporter Marathi
June 30, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 सचिन अहिर यांचा प्रवेश तात्काळ उपसभापतीपदाची लॉटरी               ...

नसरापूर भिमराव कांबळे फाशी निकाल: न्यायव्यवस्थेवर वाढता विश्वास, समाजात समाधानाची भावना

नसरापूर भिमराव कांबळे फाशी निकाल: न्यायव्यवस्थेवर वाढता विश्वास, समाजात समाधानाची भावना

by Public Reporter Marathi
June 30, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 प्रकरणाची पार्श्वभूमी नसरापूर भीमराव कांबळे प्रकरणाची घटना दि. 1 मे 2026 रोजी घडल्याचे समोर...

महाराष्ट्रात पावसाचा मोठा बदल; कोकणात मुसळधार, विदर्भात 2 जुलैपासून जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा मोठा बदल; कोकणात मुसळधार, विदर्भात 2 जुलैपासून जोरदार पावसाचा इशारा

by Public Reporter Marathi
June 29, 2026
0

🔴 By | गितांजली थोरात महाराष्ट्रात यंदा पावसाचे चित्र अत्यंत बदलते राहिले आहे. मे महिन्यापासूनच पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यभर उष्णतेचा...

अमेरिकेचे इराणवर सतत हल्ले सुरू, जगासमोर पुन्हा अमेरिका – इराण युद्धाची भीती

अमेरिकेचे इराणवर सतत हल्ले सुरू, जगासमोर पुन्हा अमेरिका – इराण युद्धाची भीती

by Public Reporter Marathi
June 28, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव युद्धविरामानंतर पुन्हा संघर्ष भडकला, अनेक लष्करी ठिकाणे लक्ष्य पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण...

युरोप मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे विक्रमी तापमान, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

युरोप मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे विक्रमी तापमान, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

by Public Reporter Marathi
June 27, 2026
0

🔴 By | गितांजली थोरात 🟡 सध्याची भीषण परिस्थिती युरोपमध्ये सध्या उष्णतेची लाट अत्यंत तीव्र झाली असून अनेक देशांमध्ये तापमान...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697