Friday, July 31, 2026
publicreportermarathi
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन
No Result
View All Result
publicreportermarathi
No Result
View All Result

महाराष्ट्रात एल पी जी गॅसचा तुटवडा नाही; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून नियंत्रण कक्ष व जिल्हा समित्या

Public Reporter Marathi by Public Reporter Marathi
March 13, 2026
in maharashtra
0
महाराष्ट्रात एल पी जी गॅसचा तुटवडा नाही; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून नियंत्रण कक्ष व जिल्हा समित्या
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

By | अरविंद जाधव

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घरगुती व व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष (Control Rooms) सुरू करण्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना गॅस वितरणावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गॅस पुरवठा व्यवस्थेचे नियमित परीक्षण करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, राज्यात घरगुती LPG गॅसचा कोणताही तुटवडा नाही. उलट मार्च महिन्यातील उपलब्धता मागील सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस साठवून ठेवण्याची गरज नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्यांमध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी असतील. गॅसचा साठा, वितरण आणि वाहतूक यावर सतत देखरेख ठेवणे तसेच दररोजचा अहवाल राज्य नियंत्रण कक्षाला पाठवणे ही समित्यांची जबाबदारी असेल.

मुंबई-ठाणे रेशनिंग क्षेत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार असून रेशनिंग नियंत्रक यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करणार आहे. या समितीत पोलीस व रेशनिंग विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील आणि मुंबई-ठाणे परिसरातील गॅस वितरणावर समन्वय साधला जाईल.

दरम्यान, अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. रुग्णालये, सरकारी वसतिगृहे, शाळा-महाविद्यालयांतील मेस, मध्यान्ह भोजन योजना तसेच आश्रमशाळा यांना घरगुती किंवा व्यावसायिक LPG सिलिंडरचा पुरवठा प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे.

हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांशी बैठका घेऊन गरज भासल्यास पर्यायी इंधनाचा वापर करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि वृत्तपत्रांद्वारे नागरिकांना अधिकृत माहिती दिली जाणार आहे. सोशल मीडियावर गॅस तुटवड्याबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केले जाणार असून व्हॉट्सअॅप सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. गॅस बुकिंग अॅप किंवा मिस्ड कॉल सेवांमध्ये तांत्रिक अडचणी आढळल्यास तेल कंपन्यांना त्या तात्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात दररोज सरासरी सुमारे ९ हजार मेट्रिक टन LPG ची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील उत्पादन वाढवून सुमारे ११ हजार मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय घरगुती वापरासाठी पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) चा साठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पेट्रोल व डिझेलचा साठा देखील राज्यात मुबलक असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. दररोज सुमारे १५ हजार किलोलिटर पेट्रोल आणि ३८ हजार किलोलिटर डिझेलचे उत्पादन होत आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस पुरवठ्याबाबत घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे. प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली असून राज्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: #LPGSupply #MaharashtraNews #GasCylinder #FuelUpdate #BreakingNewsमहाराष्ट्र बातम्या LPG गॅस गॅस सिलिंडर अन्न व नागरी पुरवठा विभाग इंधन पुरवठा महाराष्ट्र सरकार गॅस तुटवडा इराण इस्रायल तणाव पेट्रोल डिझेल इंधन अपडेट
Previous Post

शिवसेना पक्ष चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार ठाकरे गटाची बाजू

Next Post

जागतिक युद्ध तणावात उत्तर कोरियाचे शक्तिप्रदर्शन; ‘गरज पडल्यास शस्त्रांचा वापर तात्काळ’

Public Reporter Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

by Public Reporter Marathi
July 31, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 जागतिक पार्श्वभूमी – वाढता साठा आणि आकडेवारी जागतिक स्तरावर चीनच्या युरेनियम साठ्याबाबत चिंतेचे वातावरण...

अमेरिकेचे प्रहार; मध्यपूर्वेत हवाई हल्ल्यांची जोरदार मालिका

अमेरिकेचे प्रहार; मध्यपूर्वेत हवाई हल्ल्यांची जोरदार मालिका

by Public Reporter Marathi
July 30, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 रात्री सुरू झालेले समन्वित हल्ले अमेरिकेने मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अत्यंत अचूक आणि नियोजित लष्करी...

पाकिस्तानमध्ये आंदोलन पेटले; 35 आंदोलकांचा मृत्यू, कारवाईवर तीव्र संताप

पाकिस्तानमध्ये आंदोलन पेटले; 35 आंदोलकांचा मृत्यू, कारवाईवर तीव्र संताप

by Public Reporter Marathi
July 29, 2026
0

🔴 By | प्रविण कदम 🟡 आंदोलनाचा उद्रेक कशामुळे? पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये अलीकडेच घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष...

कॉक्रोच पार्टीच्या दणक्यानंतर आता ‘E20 जनता पार्टी’चा इशारा; सरकारसमोर नवं टेन्शन उभं राहणार?

कॉक्रोच पार्टीच्या दणक्यानंतर आता ‘E20 जनता पार्टी’चा इशारा; सरकारसमोर नवं टेन्शन उभं राहणार?

by Public Reporter Marathi
July 27, 2026
0

🔴 By | प्रविण कदम मुंबई - देशात इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावरून निर्माण झालेला वाद आता आणखी तीव्र होण्याची...

अमित शाह यांचा राजीनामा मागणी ? आंदोलन व विरोधकांचा वाढता दबाव अधिवेशनात रंग आणणार?

अमित शाह यांचा राजीनामा मागणी ? आंदोलन व विरोधकांचा वाढता दबाव अधिवेशनात रंग आणणार?

by Public Reporter Marathi
July 26, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात  नवी दिल्ली - देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा...

जंतर मंतर परिसरात अन्नसेवा बंदी? दिल्ली पोलिसांची ऑनलाइन अन्नपुरवठा कंपन्यांना निर्देश

जंतर मंतर परिसरात अन्नसेवा बंदी? दिल्ली पोलिसांची ऑनलाइन अन्नपुरवठा कंपन्यांना निर्देश

by Public Reporter Marathi
July 25, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 आंदोलनाची पार्श्वभूमी आणि वाढती वस्तुस्थिती राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका फुटीच्या...

“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र” — 26 जुलै मुंबई मोर्चा

“विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र” — 26 जुलै मुंबई मोर्चा

by Public Reporter Marathi
July 23, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 NEET पेपर लीक: विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह NEET (UG) परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात...

पाकिस्तान मागतोय भारताकडे पाणी; इंडस करार पुन्हा चर्चेत

पाकिस्तान मागतोय भारताकडे पाणी; इंडस करार पुन्हा चर्चेत

by Public Reporter Marathi
July 22, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 इंडस कराराचा उगम आणि स्वरूप 1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंडस वॉटर ट्रीटीवर...

मुंबईत जमावबंदी आदेश लागू; आंदोलन आणि सुरक्षा धोक्यांमुळे पोलिसांची कडक कारवाई

मुंबईत जमावबंदी आदेश लागू; आंदोलन आणि सुरक्षा धोक्यांमुळे पोलिसांची कडक कारवाई

by Public Reporter Marathi
July 21, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 तणावपूर्ण पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई...

बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा; पाकिस्तानात तणाव वाढला

बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा; पाकिस्तानात तणाव वाढला

by Public Reporter Marathi
July 20, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 बलुचिस्तान स्वातंत्र्याचा दावा; व्हायरल चर्चेमागील सत्य काय? पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताने स्वतःला स्वतंत्र देश घोषित...

इस्रोमध्ये राजीनाम्यांची लाट: ‘ब्रेन ड्रेन’मुळे भारताच्या अंतराळ स्वप्नांना धक्का?

इस्रोमध्ये राजीनाम्यांची लाट: ‘ब्रेन ड्रेन’मुळे भारताच्या अंतराळ स्वप्नांना धक्का?

by Public Reporter Marathi
July 19, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 इस्रोमध्ये ‘ब्रेन ड्रेन’चा स्फोट — भारताचे अंतराळ स्वप्न धोक्यात? भारताच्या अंतराळ क्षेत्रात मोठा हादरा...

अडाणी प्रकरणात नवे वळण: अमेरिकन न्यायालयामुळे संकट वाढणार ?

अडाणी प्रकरणात नवे वळण: अमेरिकन न्यायालयामुळे संकट वाढणार ?

by Public Reporter Marathi
July 18, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 अमेरिकन न्यायालयाची अडाणी प्रकरणात न्याय विभागावर कठोर भूमिका; शपथपत्राची मागणी न्यूयॉर्क: उद्योगपती गौतम अडाणी...

भारताची पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेन – हरित रेल्वे युगाची सुरुवात

भारताची पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेन – हरित रेल्वे युगाची सुरुवात

by Public Reporter Marathi
July 17, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 ऐतिहासिक उद्घाटन – हरियाणातून हरित भविष्याची सुरुवात हरियाणामध्ये भारताच्या पहिल्या हायड्रोजन पॉवर ट्रेनचे भव्य...

एकनाथ शिंदे गटाचा केंद्रात दबदबा? मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 3 पदांची चर्चा

एकनाथ शिंदे गटाचा केंद्रात दबदबा? मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 3 पदांची चर्चा

by Public Reporter Marathi
July 14, 2026
0

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे गटा ला लॉटरी , ‘ऑपरेशन टायगर’चा प्रभाव 🔴 By | अरविंद जाधव मुंबई : दिल्लीतील सत्ताकेंद्रात...

हॉर्मूज बंद, जगात खळबळ: मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती गंभीर

हॉर्मूज बंद, जगात खळबळ: मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती गंभीर

by Public Reporter Marathi
July 12, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 जागतिक व्यापाराला मोठा धक्का मध्यपूर्वेतील तणावाने गंभीर वळण घेतले असून इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या...

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कर्जमाफीचा निर्णय, महिला शेतकऱ्यांना मिळणार नवे हक्क

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कर्जमाफीचा निर्णय, महिला शेतकऱ्यांना मिळणार नवे हक्क

by Public Reporter Marathi
July 11, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात मुंबई : महाराष्ट्राच्या चालू पावसाळी अधिवेशनात सुमारे ₹36,000 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून, याचा...

पेट्रोलमध्ये जैवइंधन मिश्रणावर देशभरात नाराजी; वाहनचालकांचा वाढता विरोध

पेट्रोलमध्ये जैवइंधन मिश्रणावर देशभरात नाराजी; वाहनचालकांचा वाढता विरोध

by Public Reporter Marathi
July 9, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 बदलत्या इंधन धोरणाची पार्श्वभूमी भारत सरकारने इंधन आयात कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि...

साताऱ्यात विजेचा भीषण धक्का; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, गावावर शोककळा

साताऱ्यात विजेचा भीषण धक्का; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, गावावर शोककळा

by Public Reporter Marathi
July 8, 2026
0

🔴 By | प्रविण कदम सातारा - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे....

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; दरडी, पूर आणि शेतीवर मोठा परिणाम

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; दरडी, पूर आणि शेतीवर मोठा परिणाम

by Public Reporter Marathi
July 7, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 राज्यभरात मान्सूनचा जोर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार तडाखा दिला असून राज्यभरात गंभीर परिस्थिती...

विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी, शेतीला दिलासा तर काही ठिकाणी पाणी साचण्याची भीती

विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी, शेतीला दिलासा तर काही ठिकाणी पाणी साचण्याची भीती

by Public Reporter Marathi
July 4, 2026
0

🔴 By | कविता गोहणे 🟡 हवामान खात्याचा अंदाज ठरला अचूक हवामान खात्याने २ जुलैपासून विदर्भात पावसाचा इशारा दिला होता...

मध्य प्रदेश ‘भूत’ रुग्णालय प्रकरण : इमारत नाही, तरी 87 पदे मंजूर — चौकशी व कारवाईची मागणी तीव्र

मध्य प्रदेश ‘भूत’ रुग्णालय प्रकरण : इमारत नाही, तरी 87 पदे मंजूर — चौकशी व कारवाईची मागणी तीव्र

by Public Reporter Marathi
July 4, 2026
0

🔴By | गीतांजली थोरात 🟡 कारवाईचा मुद्दा केंद्रस्थानी इंदूरमधील खजराना सिव्हिल हॉस्पिटल प्रकरणाने प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आणली आहे. रुग्णालय...

इराणमध्ये खामेनेई अंत्यसंस्कार सुरू; ४ ते ९ जुलै दरम्यान भव्य अंत्यसंस्कार विधि , जागतिक लक्ष केंद्रित

इराणमध्ये खामेनेई अंत्यसंस्कार सुरू; ४ ते ९ जुलै दरम्यान भव्य अंत्यसंस्कार विधि , जागतिक लक्ष केंद्रित

by Public Reporter Marathi
July 3, 2026
0

🔴By | कविता घोणे 🟡 खामेनेई यांचा इतिहास इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते आयातुल्ला अली खामेनेई यांनी तब्बल तीन...

महाडमध्ये NDRF टीम तैनात; 2016 पूल दुर्घटना आणि 2021 तळीये भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क

महाडमध्ये NDRF टीम तैनात; 2016 पूल दुर्घटना आणि 2021 तळीये भूस्खलनानंतर प्रशासन सतर्क

by Public Reporter Marathi
July 2, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 कोकणात पावसाचा जोर वाढला 30 जवान तसेच यंत्रणा सज्ज. रायगड - जिल्ह्यातील महाड येथे...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! नागरिकत्वावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! नागरिकत्वावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

by Public Reporter Marathi
July 2, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वावरून वाद तीव्र; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या (Birthright Citizenship)...

कर्नाटकात विशेष सखोल मतदार पुनरावलोकन सुरू: मतदार नोंदणी नसल्यास सरकारी लाभांवर परिणाम होण्याची शक्यता

कर्नाटकात विशेष सखोल मतदार पुनरावलोकन सुरू: मतदार नोंदणी नसल्यास सरकारी लाभांवर परिणाम होण्याची शक्यता

by Public Reporter Marathi
July 1, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव बेंगळुरू: कर्नाटकमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया सुरू होताच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी महत्त्वाचा इशारा दिला...

उद्धव ठाकरेंना सलग धक्के! ६ खासदारांनंतर सचिन अहिरही शिंदे गटात; उपसभापती निवडीआधी मोठी राजकीय खेळी

उद्धव ठाकरेंना सलग धक्के! ६ खासदारांनंतर सचिन अहिरही शिंदे गटात; उपसभापती निवडीआधी मोठी राजकीय खेळी

by Public Reporter Marathi
June 30, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 सचिन अहिर यांचा प्रवेश तात्काळ उपसभापतीपदाची लॉटरी               ...

नसरापूर भिमराव कांबळे फाशी निकाल: न्यायव्यवस्थेवर वाढता विश्वास, समाजात समाधानाची भावना

नसरापूर भिमराव कांबळे फाशी निकाल: न्यायव्यवस्थेवर वाढता विश्वास, समाजात समाधानाची भावना

by Public Reporter Marathi
June 30, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 प्रकरणाची पार्श्वभूमी नसरापूर भीमराव कांबळे प्रकरणाची घटना दि. 1 मे 2026 रोजी घडल्याचे समोर...

महाराष्ट्रात पावसाचा मोठा बदल; कोकणात मुसळधार, विदर्भात 2 जुलैपासून जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा मोठा बदल; कोकणात मुसळधार, विदर्भात 2 जुलैपासून जोरदार पावसाचा इशारा

by Public Reporter Marathi
June 29, 2026
0

🔴 By | गितांजली थोरात महाराष्ट्रात यंदा पावसाचे चित्र अत्यंत बदलते राहिले आहे. मे महिन्यापासूनच पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यभर उष्णतेचा...

अमेरिकेचे इराणवर सतत हल्ले सुरू, जगासमोर पुन्हा अमेरिका – इराण युद्धाची भीती

अमेरिकेचे इराणवर सतत हल्ले सुरू, जगासमोर पुन्हा अमेरिका – इराण युद्धाची भीती

by Public Reporter Marathi
June 28, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव युद्धविरामानंतर पुन्हा संघर्ष भडकला, अनेक लष्करी ठिकाणे लक्ष्य पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण...

युरोप मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे विक्रमी तापमान, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

युरोप मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे विक्रमी तापमान, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

by Public Reporter Marathi
June 27, 2026
0

🔴 By | गितांजली थोरात 🟡 सध्याची भीषण परिस्थिती युरोपमध्ये सध्या उष्णतेची लाट अत्यंत तीव्र झाली असून अनेक देशांमध्ये तापमान...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697