Thursday, September 17, 2026
publicreportermarathi
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन
No Result
View All Result
publicreportermarathi
No Result
View All Result

सातारा जि.प. निवडणूक वाद : पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

Public Reporter Marathi by Public Reporter Marathi
March 30, 2026
in maharashtra
0
सातारा जि.प. निवडणूक वाद : पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान उभा राहिलेला वाद आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष म्हणून पाहिले जाणारे हे प्रकरण आता प्रशासन, न्यायालय आणि सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळे अधिकच गुंतागुंतीचे बनणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना यांच्याकडे स्पष्ट बहुमत असतानाही निकालाने सर्वांना धक्का दिला. एका मताच्या फरकाने भाजपने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर विजय मिळवत राजकीय समीकरणे उलटवली. या अनपेक्षित निकालामुळे पडद्यामागील हालचालींवर संशय व्यक्त केला जाऊ लागला. विशेषतः कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नींची अध्यक्षपदी निवड झाल्याने या विजयाला अधिक राजकीय रंग मिळाला.

निवडणुकीदरम्यान दोन सदस्यांना मतदानापासून दूर ठेवण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. या घटनेमुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ कमी झाले आणि निकालावर त्याचा थेट परिणाम झाल्याची चर्चा रंगली. निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारचा हस्तक्षेप झाल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आणि चौकशीची मागणी केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषद परिसरात तुफान गोंधळ उडाला. घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि थेट रक्तपाताच्या घटना घडल्या, ज्यामुळे वातावरण पूर्णपणे तापले. या राड्यात पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाल्याचा आरोप झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

या सर्व घडामोडींमध्ये पोलीस यंत्रणेची भूमिका केंद्रस्थानी आली. विशेषतः पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या वर्तणुकीवर पक्षपातीपणाचे आरोप करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनी पोलिसांनी विशिष्ट गटाला मदत केल्याचा आरोप केला, तर पोलिसांकडून कारवाई योग्य असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

साताऱ्यातील या घटनेचे तीव्र पडसाद विधानभवनात उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “लोकशाहीचा खून” झाल्याचा आरोप करत सरकारलाच कठघऱ्यात उभे केले. “मंत्री सुरक्षित आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपसभापती नीलम गोरे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. मात्र सभापती प्रा. राम कदम यांनी ते आदेश परत घेतल्याने महायुतीतच मतभेद उघड झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुषार जोशी यांच्या निलंबन बाबत सावध भूमिका घेतल्याने राजकीय तणाव कायम राहिला.

दरम्यान, या प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली. वाई येथील न्यायालयाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना “कारणे दाखवा नोटीस” बजावली आहे. मतदान प्रक्रियेत अडथळा आणि कथित गैरवर्तनाच्या आरोपांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, यामुळे प्रकरणाला कायदेशीर दिशा मिळाली आहे.

या सर्व घडामोडींनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हा निर्णय सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याने राजकीय चर्चा अधिकच रंगल्या. तुषार दोशी यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार व शंभूराज देसाई यांची नाराजी कायम असताना ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि तुषार दोशी एका जिल्हा बैठकीत एकत्र दिसल्याने याची सोशल मीडियावर अनेक बाजूने चर्चा झाली होती. आता 4 एप्रिल रोजी होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद सभापती निवडी कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन आदेश, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय समीकरणे या तिन्ही गोष्टी या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

Tags: Political NewsSatara NewsZP निवडणूकजिल्हा परिषदतुषार दोषीपोलिस प्रशासनब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र राजकारणवाई न्यायालयसातारा बातमी
Previous Post

आरसीबी ची भावनिक श्रद्धांजली! 11 चाहत्यांसाठी चिन्नास्वामीत कायम 11 सीट्स राखीव

Next Post

मुंबईला महिला आयुक्त: अश्विनी भिडे यांच्यासमोर खड्डे, ट्रॅफिक आणि कचऱ्याची मोठी आव्हाने

Public Reporter Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानखुर्दचा ‘विघ्नराज’ सलग 20 वर्षी विराजमान; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

मानखुर्दचा ‘विघ्नराज’ सलग 20 वर्षी विराजमान; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

by Public Reporter Marathi
September 15, 2026
0

🔴 By | सोनल शर्मा 🟡 बाल गोपाळ गणेश मंडळाची 20 वर्षाची परंपरा कायम; धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन...

हैदराबाद मध्ये सोने व हिऱ्यांचा जवळपास 4 कोटींचा गणपती

हैदराबाद मध्ये सोने व हिऱ्यांचा जवळपास 4 कोटींचा गणपती

by Public Reporter Marathi
September 15, 2026
0

By | पी आर नेटवर्क हैदराबाद : गणेशोत्सवाची देशभरात धूम सुरू असताना हैदराबादमधील गणपतीची एक आगळीवेगळी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून...

राजस्थानच्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, बसपाचीही नोंद

राजस्थानच्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, बसपाचीही नोंद

by Public Reporter Marathi
September 14, 2026
0

🔴 By | पी आर नेटवर्क जयपूर : राजस्थानमधील नगर निकाय निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने...

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत; पावसाने ओढ दिली, खरीप पिके संकटात

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत; पावसाने ओढ दिली, खरीप पिके संकटात

by Public Reporter Marathi
September 13, 2026
0

🔴 By | पी आर नेटवर्क लातूर-बीड-नांदेडसह अनेक भागांत पावसाचा खंड; उभ्या पिकांकडे शेतकऱ्यांची चिंता, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर...

दहा दिवस अंधारात, तरीही मृत्यूला चकवा! नेपाळ भुयारातून चिनी नागरिक याला जीवदान

दहा दिवस अंधारात, तरीही मृत्यूला चकवा! नेपाळ भुयारातून चिनी नागरिक याला जीवदान

by Public Reporter Marathi
September 6, 2026
0

🔴 By| प्रवीण कदम 🟡 नेपाळच्या भुयारातून चिनी नागरिकाची जिवंत सुटका;  काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण महापुराने...

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी, आधी आमदार अपात्र की पक्षाची ओळख? आजच्या सुनावणीने खटल्याला निर्णायक वळण

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी, आधी आमदार अपात्र की पक्षाची ओळख? आजच्या सुनावणीने खटल्याला निर्णायक वळण

by Public Reporter Marathi
August 19, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादाने...

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; 9 जणांचा मृत्यू, चिमुकल्याचाही समावेश

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; 9 जणांचा मृत्यू, चिमुकल्याचाही समावेश

by Public Reporter Marathi
August 19, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी, 19 ऑगस्ट रोजी पहाटे हॉटेलला लागलेल्या भीषण...

तिसऱ्या अपत्यासाठीही वर्षभराची मातृत्व रजा; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

तिसऱ्या अपत्यासाठीही वर्षभराची मातृत्व रजा; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

by Public Reporter Marathi
August 19, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम चेन्नई : तमिळनाडू सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही आता...

इंडोनेशियात पुन्हा भूकंपाचा धक्का; निआसजवळ ६.१ तीव्रतेचा भूकंप

इंडोनेशियात पुन्हा भूकंपाचा धक्का; निआसजवळ ६.१ तीव्रतेचा भूकंप

by Public Reporter Marathi
August 18, 2026
0

🔴 By| सोनल शर्मा जकार्ता : इंडोनेशियाला सलग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवून सोडले आहे. पूर्व इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाजवळ १५ ऑगस्ट रोजी...

होर्मुझच्या मुद्द्यावर ओमानला ट्रम्प यांची थेट धमकी; ‘अडथळा ठरलात तर बॉम्बहल्ला करू’

होर्मुझच्या मुद्द्यावर ओमानला ट्रम्प यांची थेट धमकी; ‘अडथळा ठरलात तर बॉम्बहल्ला करू’

by Public Reporter Marathi
August 18, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम 🟡 नेमकं प्रकरण काय आहे? अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

चपला हरवल्या… कृत्रिम बुद्धिमत्तेने शोधून दिल्या! गोव्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग

चपला हरवल्या… कृत्रिम बुद्धिमत्तेने शोधून दिल्या! गोव्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग

by Public Reporter Marathi
August 17, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 उज्जैनमध्ये चपला हरवल्या, मग घेतली कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत! मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर चपला किंवा पादत्राणे...

अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

by Public Reporter Marathi
August 17, 2026
0

🔴 By| प्रवीण कदम 🟡 श्रावणी सोमवार ठरला काळा दिवस बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात सोमवारी, 17 ऑगस्ट...

गुटख्यावर १४ वर्षांपासून बंदी, तरीही काळाबाजार सुरूच; अभिनेत्यांना नोटीस जारी

गुटख्यावर १४ वर्षांपासून बंदी, तरीही काळाबाजार सुरूच; अभिनेत्यांना नोटीस जारी

by Public Reporter Marathi
August 16, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस; मुंबई : महाराष्ट्रात...

संसदेचा शेवटचा दिवस, तासांचे आव्हान : कोणते प्रश्न उपस्थित झाले आणि राजकीय संघर्ष कुठे पोहोचला?

संसदेचा शेवटचा दिवस, तासांचे आव्हान : कोणते प्रश्न उपस्थित झाले आणि राजकीय संघर्ष कुठे पोहोचला?

by Public Reporter Marathi
August 14, 2026
0

🔴 By| अरविंद जाधव 🟡 अधिवेशन संपले, पण प्रश्न कायम 2026 चे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या...

नांदेडच्या गुरुद्वारात सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; ६२ वर्षीय जसपाल सिंह ताब्यात

नांदेडच्या गुरुद्वारात सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; ६२ वर्षीय जसपाल सिंह ताब्यात

by Public Reporter Marathi
August 13, 2026
0

🔴 By | राहुल सरपाते नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी...

एअर इंडियाच्या कॅप्टनचा ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह; गांजा आढळल्याने खळबळ

एअर इंडियाच्या कॅप्टनचा ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह; गांजा आढळल्याने खळबळ

by Public Reporter Marathi
August 12, 2026
0

🔴 By | अरविंद जाधव 🟡 फ्लाइटच्या अचानक 300 फूट घसरणीच्या घटनेनंतर तपासाला नवे वळण; कॅप्टनचा दुसरा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह...

अदानी समूहाच्या दोन प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात वनजमीन मंजुरी

अदानी समूहाच्या दोन प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात वनजमीन मंजुरी

by Public Reporter Marathi
August 12, 2026
0

रायगडमध्ये सिमेंट टर्मिनलसाठी राखीव वन व अमरावतीत गॅस पाईप लाईन साठी वनजमीन 🔴 By | प्रवीण कदम मुंबई : महाराष्ट्र...

कृत्रिम बुद्धिमत्तेने घडवले नवे विषाणू; १६ विषाणू प्रयोगशाळेत कार्यक्षम

कृत्रिम बुद्धिमत्तेने घडवले नवे विषाणू; १६ विषाणू प्रयोगशाळेत कार्यक्षम

by Public Reporter Marathi
August 11, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम 🟡 कृत्रिम बुद्धिमत्तेने संपूर्ण आनुवंशिक आराखडा तयार केला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पूर्णपणे नवीन आनुवंशिक रचना...

रशिया-भारत थेट रेल्वे मार्ग प्रस्ताव: ८ हजार किमी प्रकल्पामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना

रशिया-भारत थेट रेल्वे मार्ग प्रस्ताव: ८ हजार किमी प्रकल्पामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना

by Public Reporter Marathi
August 10, 2026
0

🔴 Bt | गीतांजली थोरात 🟡 प्रस्तावाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट रशियाने भारताशी थेट रेल्वे मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडल्याची बातमी...

हवामानाचा इशारा आणि यात्रेकरूंची सुरक्षा — अमरनाथ यात्रा थांबवण्यामागचे मोठे कारण”

हवामानाचा इशारा आणि यात्रेकरूंची सुरक्षा — अमरनाथ यात्रा थांबवण्यामागचे मोठे कारण”

by Public Reporter Marathi
August 9, 2026
0

🔴 By|  प्रवीण कदम 🟡 प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा प्रशासनाने तात्पुरती स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे....

‘एक होतं माळीण’ : डोळे पाणावतील, मन सुन्न होईल; सत्यघटनेवर आधारित भावस्पर्शी चित्रपट

‘एक होतं माळीण’ : डोळे पाणावतील, मन सुन्न होईल; सत्यघटनेवर आधारित भावस्पर्शी चित्रपट

by Public Reporter Marathi
August 8, 2026
0

🔴 By : निशिगंधा मोरे 🟡 माळीण दुर्घटनेची वेदना पुन्हा जिवंत २०१४ मध्ये माळीण गावावर कोसळलेल्या भीषण दरडीने संपूर्ण महाराष्ट्राला...

किशोर कुमारांच्या ‘गौरी कुंज’ला विराट कोहलीचा लक्झरी टच; ऐतिहासिक बंगल्याचा बदलला चेहरा

किशोर कुमारांच्या ‘गौरी कुंज’ला विराट कोहलीचा लक्झरी टच; ऐतिहासिक बंगल्याचा बदलला चेहरा

by Public Reporter Marathi
August 8, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 गौरी कुंज’ – संगीतविश्वाचा जिवंत वारसा मुंबईच्या जुहू परिसरातील ‘गौरी कुंज’ हा बंगला भारतीय...

यूपीआय व्यवहारांवर शुल्काचा मार्ग मोकळा; लोकसभेत विधेयक मंजूर

यूपीआय व्यवहारांवर शुल्काचा मार्ग मोकळा; लोकसभेत विधेयक मंजूर

by Public Reporter Marathi
August 7, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम  🟡 डिजिटल व्यवहारांमध्ये मोठा धोरणात्मक बदल देशातील डिजिटल व्यवहारांची मुख्य प्रणाली बनलेल्या यूपीआय (एकत्रित देयक...

शेख हसीना परतणार? बांगलादेशात राजकीय खळबळ; क्रिकेटपटू व खासदार साकिब अल हसनच्या घरावर हल्ला

शेख हसीना परतणार? बांगलादेशात राजकीय खळबळ; क्रिकेटपटू व खासदार साकिब अल हसनच्या घरावर हल्ला

by Public Reporter Marathi
August 6, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम 🟡 शेख हसीना देश सोडण्यामागील पार्श्वभूमी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑगस्ट 2024 मध्ये...

शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज निर्णायक सुनावणी ?

शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज निर्णायक सुनावणी ?

by Public Reporter Marathi
August 6, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात मुंबई | शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. जून...

विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल नाकारण्याचा विचार; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र व विमा नियामक मंडळ ला निर्देश

विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल नाकारण्याचा विचार; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र व विमा नियामक मंडळ ला निर्देश

by Public Reporter Marathi
August 5, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम नवी दिल्ली |रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत यांनी विमा नसलेल्या वाहनांवर कठोर भूमिका घेतली...

अमेरिकेत भीषण वणवा; गव्हर्नरकडून आपत्कालीन स्थिती जाहीर, हजारोंचे स्थलांतर

अमेरिकेत भीषण वणवा; गव्हर्नरकडून आपत्कालीन स्थिती जाहीर, हजारोंचे स्थलांतर

by Public Reporter Marathi
August 3, 2026
0

🔴 By | प्रवीण कदम 🟡 स्थिती गंभीर; प्रशासन सतर्क अमेरिकेतील काही भागांमध्ये भीषण वणव्याने उग्र रूप धारण केल्यामुळे राज्याच्या...

कॉमनवेल्थ गेम्स 2026: भारताची 39 पदकांसह दमदार कामगिरी

कॉमनवेल्थ गेम्स 2026: भारताची 39 पदकांसह दमदार कामगिरी

by Public Reporter Marathi
August 2, 2026
0

🔴By| गीतांजली थोरात 🟡 प्रभावी सुरुवात आणि पदकांची सातत्यपूर्ण कमाई कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय संघाने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी करत...

पतंजलीचा मोठा विस्तार: आता विमा क्षेत्रातही एंट्री

पतंजलीचा मोठा विस्तार: आता विमा क्षेत्रातही एंट्री

by Public Reporter Marathi
August 1, 2026
0

🔴By | प्रवीण कदम 🟡 विमा क्षेत्रात पतंजलीची मोठी झेप भारतातील दैनंदिन वापरातील ग्राहक वस्तू आणि आयुर्वेद क्षेत्रात मोठं स्थान...

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

1.3 लाख टन युरेनियमचा साठा, हजारो टन गुप्त व्यवहार? चीनच्या हालचालींनी जग हादरलं!

by Public Reporter Marathi
July 31, 2026
0

🔴 By | गीतांजली थोरात 🟡 जागतिक पार्श्वभूमी – वाढता साठा आणि आकडेवारी जागतिक स्तरावर चीनच्या युरेनियम साठ्याबाबत चिंतेचे वातावरण...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697